अबू आझमींच्या औरंगजेब समर्थनावर राजकीय वादंग; सर्वपक्षीय निषेध.

24 प्राईम न्यूज 4 मार्च 2025
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोमवारी औरंगजेबाच्या कार्याची स्तुती करणारी विधाने केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. “औरंगजेब क्रूर शासक नव्हता, त्याने मंदिरे बांधली आणि हिंदू-मुस्लिम संघर्ष नव्हता,” असे आझमी म्हणाले.
त्यांच्या या विधानावर सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा,” अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही आझमींवर टीका करत भाजप सरकारवरही प्रश्न उपस्थित केला.
यापूर्वीही अबू आझमी यांनी औरंगजेबाचे समर्थन केले असून, २०२३ मध्ये त्यांना यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यांच्या या नव्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.