पिंगळवाडे जि.प. शाळेच्या चार विद्यार्थ्यांना स्काऊटच्या राज्यस्तरीय ‘कब’ पुरस्काराने सन्मान..

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर: तालुक्यातील पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी स्काऊट अंतर्गत ‘कब’ विभागातील राज्यस्तरीय चतुर्थचरण चाचणी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला आहे.

राज्य भारत स्काऊट-गाईड कार्यालयातर्फे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील स्काऊटच्या ‘कब-बुलबुल’ पथकांचे तीन दिवसीय निवासी राज्यस्तरीय चाचणी शिबिर 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान हस्ती भवन, दोंडाईचा (धुळे) येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 146 विद्यार्थी सहभागी झाले होते.

पिंगळवाडे जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक आणि कब मास्टर दत्तात्रय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 3 री आणि 4 थीच्या चार विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. गिरीष किशोर चव्हाण (3 री), हर्ष समाधान पाटील (4 थी), राजवीर संजय पाटील (4 थी) व सम्राट भूषण कोळी (4 थी) यांनी लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय पुरस्कार पटकावला.

कब विभागात जळगाव जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषद शाळा म्हणून नियमितपणे राज्यस्तरीय पुरस्कार चाचणी परीक्षेत सहभाग घेतल्याबद्दल कब मास्टर दत्तात्रय सोनवणे यांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच, तिसरीतील विद्यार्थी गिरीष किशोर चव्हाण याच्या विशेष प्राविण्यासाठी शिबीर प्रमुख जीवन मटके (ठाणे) यांनी गौरवोद्गार काढले.

या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, डायटचे प्राचार्य अनिल झोपे, स्काऊट जिल्हा मुख्य आयुक्त व प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, जिल्हा सचिव सरला पाटील, जिल्हा सहसचिव डी.एस. सोनवणे, गाईडच्या जिल्हा संघटक हेमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!