मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवलेले ७० हजार रुपये लांबवले..

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात अरिहंत मेडिकल समोर ३ मार्च रोजी दुपारी २:५५ वाजता मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवलेले ७० हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली.

ढेकू रोडवरील जिजाऊ नगर येथे राहणारे जीएस हायस्कूलमधील शिक्षक निखिल रत्नाकर पाटील व त्यांची पत्नी, सेंट मेरी शाळेतील शिक्षिका पल्लवी पाटील, यांनी घरगुती कामासाठी अनुक्रमे जेडीसीसी बँकेतून २० हजार आणि बडोदा बँकेतून ५० हजार रुपये काढले. हे सर्व पैसे आणि बँकेची पासबुक त्यांनी पल्लवी पाटील यांच्या पर्समध्ये ठेवले व ती मोटरसायकल क्रमांक एमएच १९ एच २३०० च्या डिक्कीत ठेवली.

नंतर औषध खरेदीसाठी अण्णाभाऊ साठे चौकातील मेडिकल दुकानात गेल्यानंतर काही वेळाने परत आल्यावर त्यांना डिक्की उघडी आढळली आणि पर्ससह पैसे गायब असल्याचे लक्षात आले.

अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!