अमळनेरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त तपासणी शिबिर व सन्मान सोहळा..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : जागतिक महिला दिनानिमित्त सुखांजनी फाऊंडेशन व सुखांजनी हॉस्पिटल, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “तपासणी व मार्गदर्शन शिबिर” तसेच “उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्य तपासणीसोबतच समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम शनिवार, ८ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता, सुखांजनी हॉस्पिटल, स्टेशन रोड, अमळनेर येथे होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती स्मिता उदय वाघ (जकगाव) तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. जयश्री अनिल पाटील (मा. जि.प. सदस्य, अमळनेर), सौ. अॅड. ललिता श्याम पाटील (अध्यक्षा, जिजाऊ बहुउद्देशीय संस्था, अमळनेर), सौ. तिलोत्तमा पाटील (मा. सभापती, कु.उ.बा. समिती, अमळनेर) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सन्मानार्थी महिलांचा गौरव
या कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. यात सौ. स्वप्ना विक्रांत पाटील (महिला मराठा महासंघ, अमळनेर), श्रीमती मंगलाताई वेताळ पवार (पी.एस.आब., अमळनेर), श्रीमती भारती पाटील (अध्यक्षा, आधार संस्था), सौ. सोनाली किरण वंजारी, सौ. रश्मी शामकांत बडगुजर (सामाजिक कार्यकर्त्या) आदींचा समावेश आहे.
महिला आरोग्य तपासणी शिबिर
या सोहळ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे महिला आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर, जिथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. डॉ. जयेश सुखदेव शिंदे व डॉ. प्रतिज्ञा जयेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत.
महिलांसाठी प्रेरणादायी सोहळा
महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आयोजित हा कार्यक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे अमळनेर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ठिकाण: सुखांजनी हॉस्पिटल, स्टेशन रोड, अमळनेर
वेळ: शनिवार, ८ मार्च २०२५, सकाळी १० वाजता