अमळनेरात महिलादिनी सुप्रसिद्ध शिवव्याख्यानाचे आयोजन..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिजाऊ बहुउद्देशीय संस्था, अमळनेर तालुका मराठा समाज आणि अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सचिन देवरे (पाचोरा) यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा विशेष कार्यक्रम ८ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे संपन्न होणार आहे. महिलासक्षमीकरण आणि त्यांचा सन्मान याविषयी मौलिक विचार मांडले जाणार असून, महिला आणि पुरुष दोघांनीही या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.
सुप्रसिद्ध व्याख्याते सचिन देवरे यांचे ओजस्वी विचार ऐकण्यासाठी सर्व रसिक श्रोते, महिला भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.