पातोंडा आणि सावखेडा येथे मोबाईल चोरीच्या घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यात मोबाईल चोरीच्या घटनांनी उचल खाल्ली असून, पातोंडा येथे दोन आणि सावखेडा येथे एका चोरीची नोंद झाली आहे.
सावखेडा येथे एका सालदार मजुराला चोपडा सेंटिंगसाठी ट्रॅक्टर लागणार असल्याचे सांगून चोरट्याने त्याचा 14 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला आणि पसार झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असून, अमळनेर पोलीस स्टेशनने चोरट्याचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.