आरोग्य कर्मचारी संघटनांच्या लढ्याला मिळाले यश….. -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांची झाली बदली..

फहीम शेख/नंदुरबार
नंदूरबार येथील आरोग्य विभागाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करीत कामगार संघटनानी केलेल्या आंदोलनामुळे त्यांची झाली बदली. सविस्तर वृत्त की, नंदुरबार येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे हे मनमानी कारभार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याचे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक देणे, प्रत्येक बाबतीत आर्थिक व्यवहार करणे, कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरणे. या विरोधात मेग्मो संघटना सह डॉक्टर संघटना, परिचारिका संघटना तसेच विविध आदिवासी संघटनांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात शासनाला निवेदन दिले होते. गेल्या महिनाभर विविध आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केले.कामगार संघटनांच्या तीव्र आंदोलन मुळे डॉ वर्षा लहाडे यांच्याविरुध्द चौकशी समिती नेमण्यात आली होती. डॉ. वर्षा लहाडे यांचेविरुध्द प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. योगेश चित्ते, सहायक संचालक (वैद्यकीय) आरोग्य सेवा, नाशिक यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समितीने दि. २४ जानेवारी २०२५ रोजी अहवाल सादर केला होता. सदर चौकशी समितीच्या अहवालानुसार प्राप्त तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने प्रशासकीय कारणास्तव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांची बदली करण्यात आली आहे. डॉ वर्षा लहाडे यांची जळगांव जिल्ह्यातील धरणगाव येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त पदावर डॉ. कांतराव धोंडीबा सातपुते, अति. जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय, नंदूरबार यांचेकडे सोपविण्यात आला आहे.
वैद्यकीय अधिकारी व आदिवासी संघटनांचा आंदोलनाला यश मिळाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.