जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, महिलांसाठी विविध योजनांची माहिती..

24 प्राईम न्यूज 10 मार्च 2025
नंदुरबार येथील जनसेवा महिला सवय सहायता बचत गटाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदा जनसेवा फाउंडेशन नंदुरबारच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि फाउंडेशनच्या संस्थापिका जुबैदा बागवान होत्या.
यावेळी कार्यक्रमात महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. अध्यक्षांनी आपल्या मनोगतात किशोरी शक्ती योजना, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, राजीव गांधी छात्रावास योजना, बेटी बचाव बेटी पढाव योजना, लाडकी बहीण योजना, महिला सन्मान योजना आणि विशेष इंदिरा महिला शक्ती उत्तम प्रोत्साहन योजना यांसारख्या योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. विशेषतः महिलांसाठी 2025 मध्ये 50 लाख रुपयांपर्यंत कर्जसुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जनसेवा महिला सवय सहायता बचत गटाच्या अध्यक्ष रुकसाना एजाज बागवान होत्या. तसेच सचिव उजमा बागवान, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष शकीला खाटीक, सदस्य सायमा नाज यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिजवाना बागवान यांनी केले तर आभार प्रदर्शन आ मेरा बागवान यांनी मानले.
या उपक्रमामुळे महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळाली असून भविष्यात त्या योजनांचा लाभ घेता येणार आहे.