अमळनेर पोलिसांकडून बेवारस दुचाकी वाहनांचा लिलाव जाहीर..

आबिद शेख/अमळनेर
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत असलेल्या १५ दुचाकी वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस ठाण्याने संबंधित वाहन मालकांचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र अद्याप कोणीही मालकी हक्क सांगितलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ८५ अन्वये जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ७ मार्च २०२५ रोजी हा जाहीरनामा जारी केला. या अन्वये जाहीरनाम्यात नमूद केलेल्या वाहनांच्या मालकांनी, हितसंबंधी व्यक्तींनी किंवा विमा दावा करणाऱ्या व्यक्तींनी मूळ दस्तऐवजासह ६० दिवसांच्या आत पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. दिलेल्या मुदतीनंतर कोणत्याही प्रकारचा हक्क ग्राह्य धरला जाणार नाही, आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ८७ नुसार वाहनांचा लिलाव करण्यात येईल.
संबंधित वाहनांची यादी खालीलप्रमाणे आहे:
- बजाज पल्सर (GJ-21-BP-1334)
- यामाहा एफ.होड (भगवा रंग) (MD121C021A2032642)
- बजाज सी.टी. १०० (MD2A18AZ9FWA14821)
- हिरो स्प्लेंडर NXG (MH-19-DY-0412)
- बजाज ४५ (लाल रंग) (इंजिन नं. 31F00M22581)
- हिरो होंडा स्प्लेंडर (इंजिन नं. HA10BEDHF21303)
- हिरो पॅशन प्रो (MH-19-BH-3741)
- बजाज प्लॅटीना (MD2DDDZZZNWD1660)
- हिरो एचएफ डिलक्स (लाल-काल्या पट्ट्यांची) (MP-10-MG-4408)
- बजाज (लाल-काल्या पट्ट्यांची विना नंबरची मोटारसायकल) (MH-19-CC-5747)
- बजाज डिस्कव्हर (काळा रंग) (MH-12-FT-6172)
- टीव्हीएस (काळा रंग) (GJ-05-DP-6575)
- टीव्हीएस (काळा रंग) (MH-18-X-6336)
संबंधित वाहन मालक किंवा इच्छुकांनी वेळेत संपर्क साधावा अन्यथा पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविली जाईल.