संसारात धडपडणाऱ्या विधवा,परित्यक्ता, शेतमजूर व कष्टकरी महिलांचा सन्मान आदर्श उपक्रम… हभप रविकिरण महाराज….!

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर येथील संसारात धडपडणाऱ्या विधवा, परित्यक्ता,कष्टकरी, शेतमजूर, घरेलू कामगार,गृहउद्योगी व पतीच्या व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्वावलंबी महिलांचा सत्कार अन सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त करण्याचा आदर्श उपक्रम सामाजिक कार्यकर्त्यां सौ.स्वप्ना विक्रांत पाटील व माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी राबविल्याचे प्रतिपादन हभप रविकिरण महाराज यांनी वडचौक भागातील महिलांचा सन्मान व जाहीर कीर्तनाच्या समारंभ प्रसंगी केले. ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्ताने संसारात धडपडणाऱ्या विधवा,परित्यक्ता,कष्टकरी, शेतमजूर,घरेलू कामगार, गृहउद्योगी व पतीच्या व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्वावलंबी महिला भिकुबाई वसंत पाटील, सुनंदा संतोष महाजन, गीताबाई रविन्द्र बडगुजर, छायाबाई सुरेश वसाने, कविता कांतीलाल महाजन, हेमा गणेश परदेशी, ज्योती प्रदीप वाणी, मनिषा संजय घोडके, रुपाली दिपक बारी व रत्ना वसंत मराठे यांचा सत्कार व सन्मान सामाजिक कार्यकर्त्यां सौ.स्वप्ना विक्रांत पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, याप्रसंगी माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, माजी प्रशासक तिलोत्तमा पाटील, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरेश पाटील, माजी नगरसेवक भूतबापू पाटील, हिंमत देसले, मराठा समाज अध्यक्ष जयवंत पाटील, माजी उपनगराध्यक्ष रामदास शेलकर, पांडुरंग महाजन, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, पदाधिकारी संजय पाटील, जितेंद्र ठाकूर, महेंद्र रामोशी, रवि मोरे, ईश्वर महाजन, मिलिंद पाटील, उमाकांत ठाकूर, तालुका कुस्तीगीर संघ अध्यक्ष बाळू पाटील, वारकरी संप्रदायातील पदाधिकारी अरुण बापू पाटील आदिसह मान्यवर उपस्थित होते, यावेळी कीर्तनाच्या माध्यमातुन हभप रविकिरण महाराज यांनी आपल्या आवडत्या सुप्रसिद्ध अहिराणी बोली भाषेतून हसत खेळत व विनोदी पद्धतीने संस्कार, समाज प्रबोधन व जनजागृती केली. महिलांचा सन्मान व भव्य कीर्तनाच्या कार्यक्रमाला शहरातील व ग्रामीण भागातील महिला व पुरुष मंडळीनी मैदान परिपूर्ण भरून भरगच्च गर्दी होती. कार्यक्रमासाठी श्री.विकांत पाटील मित्र परिवारातील सर्व कार्यकर्त्यांनी फार मेहनत घेवून कार्यक्रम यशस्वी केला.