अमळनेर पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद – बीएसएनएलच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना आणि पोलिसांना मनःस्ताप..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर: अमळनेर पोलीस ठाण्याचा लँडलाइन क्रमांक गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे, मात्र त्याच्या दुरुस्तीसाठी बीएसएनएल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे वेळच नाही. यामुळे पोलिसांनाही त्रास सहन करावा लागत आहे, तर नागरिक संभ्रमात आहेत.
या फोन क्रमांकावर कॉल केल्यास रिंग जाते, मात्र पोलीस ठाण्यात कोणतीही रिंग वाजत नाही. तातडीच्या घटनांमध्ये नागरिक पोलिसांशी थेट संपर्क साधू शकत नसल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.
पोलीस ठाण्याचा क्रमांक हा सार्वजनिक असून, कोणत्याही महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण यावरून होत असते. मात्र बीएसएनएलच्या दुर्लक्षामुळे पोलिसांनीही डोक्याला हात मारून घेतला आहे. तत्काळ हा क्रमांक पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी पोलिसांसह नागरिकांमधून होत आहे.