अमळनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या मागण्यांसाठी निवेदन..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (ज्यूक्टो) यांच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तहसीलदार मा. रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादा भुसे यांच्याकरिता सादर करण्यात आले.
शिक्षक संघटनेने शासनाच्या आश्वासनांनंतरही अद्याप मागण्या पूर्ण झालेल्या नसल्याने नाराजी व्यक्त केली. 17 मार्च 2025 रोजी राज्यभर तहसील कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये आणि शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शिक्षक आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला.
प्रमुख मागण्या:
- 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
- 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षकांनाही जुनी पेन्शन योजना लागू करावी.
- अंशतः अनुदानित शिक्षकांना त्वरित टप्पा वाढ व प्रलंबित अनुदान देण्यात यावे.
- आयटी शिक्षकांच्या समायोजनासाठी शासनादेश त्वरित निर्गमित करावा.
- 10, 20, 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी व निवडश्रेणीतील 20% अट रद्द करावी.
- प्रलंबित वाढीव पदांचे त्वरित समायोजन करावे.
- विनाअनुदानित शिक्षकांची अनुदानित पदांवर बदली करावी.
- उच्च शिक्षण प्राप्त (M.Phil., PhD) शिक्षकांना वेतनवाढ लागू करावी.
- निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे.
- ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रिया बंद करावी.
शिक्षक संघटनेने शासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
प्रतिनिधींची उपस्थिती:
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिनेश बोरसे, सचिव प्रा. स्वप्निल पवार, जिल्हा प्रतिनिधी प्रा. जी. एल. धनगर, प्रसिद्धीप्रमुख प्रा. किरण पाटील, प्रा. प्रशांत ठाकुर, प्रा. सी. आर. पाटील, प्रा. विलास पाटील, प्रा. पंकज तायडे, प्रा. डॉ. भरतसिंग पाटील, प्रा. वसंत पाटील, प्रा. बापू संदानशिव, प्रा. देवेंद्र वानखेडे, प्रा. देवेंद्र तायडे, प्रा. गुणवंत पाटील, प्रा. भालचंद्र शेलकर, प्रा. स्वप्निल भांडारकर यांच्यासह अनेक प्राध्यापक उपस्थित होते.