औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात आंदोलनाची तयारी; हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा..

0

आबिद शेख/अमळनेर

छत्रपती संभाजीनगर – क्रूरकर्मा मोगल सम्राट औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी उग्र भूमिका घेतली आहे. विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर ही कबर हटवण्यात आली नाही, तर कारसेवा करून ती स्वतः नष्ट करण्यासाठी कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये जमणार आहेत.

औरंगजेबाच्या हिंदुद्वेष्ट्या कारवायांची आठवण करून देत या संघटनांनी सांगितले की, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी लढणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबाचे स्मारक असणे म्हणजे देशाच्या अस्मितेचा अपमान आहे.

औरंगजेबाने गुरु तेग बहादूर यांची हत्या, गुरु गोविंदसिंह यांच्या लहान मुलांना भिंतीत जिवंत चिणून मारणे, काशी विश्वनाथ, मथुरा आणि सोमनाथ मंदिरांचा विध्वंस, हिंदू धर्मांतरासाठी केलेले प्रयत्न, तसेच हजारो हिंदूंचा नरसंहार – अशा अनेक अमानुष कृती केल्या. त्यामुळे आजच्या स्वातंत्र्य भारतात त्याच्या कबरीला स्थान असू नये, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

प्रशासनाने त्वरित कारवाई करावी – हिंदुत्ववादी संघटना

संघटनांनी प्रशासनाला मागणी केली आहे की, औरंगजेबाची कबर त्वरित हटवण्यात यावी आणि त्याचे कुठलेही अवशेष उरू नयेत. अन्यथा, हिंदुत्ववादी संघटना स्वतः कारसेवा करून कबर हटवतील, असा इशारा देण्यात आला आहे.

या प्रकरणावर प्रशासनाने काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तथापि, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी स्थानिक प्रशासन सतर्क असून कायदा आणि सुव्यवस्थेवर विशेष लक्ष दिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!