बारावीपाठोपाठ दहावीचा निकालही १५ मेपूर्वी..

आबिद शेख अमळनेर
सोमवारी दहावीची परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी आणि पालक सुट्टीचे नियोजन करू लागले असतानाच, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल प्रक्रियेला वेग दिला आहे. प्राप्त माहितीनुसार, बारावीचा निकाल १० मेपर्यंत आणि दहावीचा निकाल १५ मेपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे.
मंडळाने शिक्षकांना जलदगतीने पेपर तपासणीच्या सूचना दिल्या असून, पुरवणी परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे. यंदा दोन्ही परीक्षा १० दिवस आधीच सुरू झाल्याने निकालही लवकर जाहीर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.