डी. डी. नगर रहिवाशांचा पाणीटंचाई विरोधात नगरपालिकेत मोर्चा..

आबिद शेख/ अमळनेर
धुळे रोड येथील दादासाहेब देशमुख नगरातील वन बीएचके रहिवाशांनी पाणीपुरवठा अपुरा होत असल्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दि. २४ रोजी नगरपालिकेत धाव घेतली. सुमारे ५० ते ६० महिला व पुरुषांनी एकत्र येत उपमुख्य अधिकारी रविंद्र चव्हाण यांना निवेदन दिले.
रहिवाशांनी पाणीटंचाई त्वरित सोडवण्याची मागणी केली, ज्यावर अधिकारी चव्हाण यांनी लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरपालिका कर्मचारी मनोज निकुम आणि डीडी नगरमधील अनेक नागरिक उपस्थित होते.