नंदुरबार एस.टी. आगारात इफ्तार पार्टीचे आयोजन – -सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश…

24 प्राईम न्यूज 24 मार्च 2025
नंदुरबार : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारात पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार व्यवस्थापक श्री. संदीप निकम होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेश वसावे (मिशन ट्रस्टी), अशोक कुवर,मौलाना शाहरुख सहब, अखलाक जावेद शेख,(बौद्धाचार्य), एजाज बागवान (संस्थापक अध्यक्ष, इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन), मौलाना जाकीर, रोहिदास वळवी (सामाजिक कार्यकर्ते), डॉ. मतीन शेख, सुनील महिरे (बौद्धाचार्य), डॉ. जमील मंसूरी आणि आफताब खान (पुढारी न्यूज रिपोर्टर) यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात बोलताना श्री. संदीप निकम यांनी सांगितले की, “नंदुरबार आगारात आम्ही सर्व धर्मांचे सण उत्साहात साजरे करतो. राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव कायम राखण्याच्या उद्देशाने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.”
या कार्यक्रमाचे आयोजन क्रिएटिव्ह टीम, राज्य परिवहन आगार नंदुरबार यांनी केले होते. यावेळी राज्य परिवहन विभाग कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, नंदुरबार शहर आगार कामगार संघटनेचे शहराध्यक्ष शरीफ मंसूरी, आसिफ पठाण, जावेद पिंजारी, वसीम शेख, इदरीस कुरेशी, वसीम चिखलीकर, एजाज पटवे, संतोष पवार, दिनेश गायकवाड, गुजराती नाना, आगळे नाना, यश गायकवाड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक नासिर खान यांनी केले, तर आभार प्रदर्शन हारून सय्यद यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला आणि सर्वधर्मीय ऐक्याचा सुंदर संदेश देत एकात्मतेचा अनोखा आदर्श उभा केला.