अंमळनेर तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त..

आबिद शेख/अमळनेर
अंमळनेर तालुक्यातील तांदळी येथे आज 23 मार्च 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता अवैध गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर प्रशासनाने जप्त केले. ही कारवाई माननीय उपविभागीय अधिकारी अमळनेर श्री. नितीन कुमार मुंडावरे साहेब व तहसीलदार श्री. रुपेश कुमार सुराणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मारवड यांच्या सहाय्याने करण्यात आली.
सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालय, अमळनेर येथे जमा करण्यात आले असून, या कारवाईत महसूल विभागाच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पथकात ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र जोगी (निंब), विक्रम कदम (शहापुर), प्रविणकुमार शिंगारे (सावखेडा), अभिमन जाधव (कन्हेरे), जितेंद्र पाटील (शिरसाळे बु.), राजेंद्र केदार (पळासदळे), आकाश गिरी (पातोंडा), सचिन बामनाथ (करणखेडा) तसेच कोतवाल वासुदेव तिरमले (शहापुर) यांचा समावेश होता.
या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती तस्करीस लगाम बसण्याची शक्यता आहे. प्रशासनाने अशा अवैध वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.