धार येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

आबिद शेख/अमळनेर
धार (ता. अमळनेर) येथे मारवाड पोलीस स्टेशनचे एपीआय जिभाऊ तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक पार पडली.
या बैठकीला धार गावाचे माजी उपसरपंच शशिकांत पाटील, अमळनेर तालुका शेतकी संघाचे माजी संचालक तसेच धारगावाचे माजी प्रभारी सरपंच अलीम मुजावर, संजय रामदास पाटील, वी. एन. मुजावर, अरुण पाटील, छोटू पाटील, सत्तार मुजावर, गयास मुजावर, हाजी नईम मुजावर, शौकत अली नईम पठाण व गयास मुजावर हे मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत परिसरातील शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन वी. एन. मुजावर यांनी केले, तर आभार अलीम भाई मुजावर यांनी मानले.