डीवायएसपी विनायक कोते यांना बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांची अनोखी भेट..

आबिद शेख/अमळनेर
नव्याने नियुक्त झालेल्या डीवायएसपी विनायक कोते यांना बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांनी त्यांचे हस्तनिर्मित स्केच भेट देत अनोख्या पद्धतीने सन्मान केला.
या विशेष भेटीच्या वेळी डॉ. मिलिंद नवसरीकर आणि डॉ. किरण बडगुजर , मनोज शिंगाने उपस्थित होते. डॉ. बाविस्कर यांनी अत्यंत बारकाईने तयार केलेले हे स्केच डीवायएसपी विनायक कोते यांनी स्वीकारले आणि कृतज्ञता व्यक्त केली.
या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर होत असून, कलात्मक सन्मानाची ही संकल्पना सर्वत्र चर्चेत आहे.