पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची अमळनेर पोलीस स्टेशनला तात्पुरती नेमणूक..

आबिद शेख/अमळनेर
जळगांव, दि. २४ मार्च २०२५ – जळगांव नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दत्तात्रय युवराज निकम यांची तात्पुरत्या स्वरूपात अमळनेर पोलीस स्टेशनला नेमणूक करण्यात आली आहे. पुढील आदेश होईपर्यंत ते अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये जबाबदारी पार पाडतील.
सध्या परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक केदार प्रकाश बारबोले हे १७ फेब्रुवारी २०२५ ते ११ मे २०२५ या कालावधीत प्रभारी अधिकारी म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे कार्यभार सुरळीत पार पडावा, यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.
हा आदेश जळगांवचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जारी केला असून, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना दिल्या आहेत.