सोनारनगर मध्ये 18 दिवसांपासून पाणी नाही; प्रशासनाने डोळेझाक.

आबिद शेख/ अमळनेर
मुंदडा नगर शेजारील सोनारनगर येथे मागील 18 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असून, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे.
नागरिकांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार फोन केले, मात्र कोणीही फोन उचलत नाही किंवा ठोस उत्तर देत नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे लोकांमध्ये तीव्र संताप असून, त्वरित पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पाणीपुरवठा विभाग झोपेत? नागरिकांचे प्रश्न अनुत्तरित!