रावेर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची उत्साहात सभा. – शेख शरीफ यांची तालुका सरचिटणीसपदी निवड..

24 प्राईम न्यूज 26 मार्च 2025.
रावेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सभा उत्साहात संपन्न झाली. ही सभा रविवारी (दि. __) रावेर येथील शासकीय विश्रामगृहात उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी (शिवा भाई) व तालुकाध्यक्ष विजय शामराव अवसरमल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेत पत्रकार संघटनेचे ध्येयधोरण, सदस्य वाढ व समाजोपयोगी उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. पत्रकार हा केवळ माहिती देणारा नसून समाजातील अन्यायाविरुद्ध लढणारा घटक आहे, असे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
यावेळी रावेर तालुका व शहर कार्यकारिणीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. शेख शरीफ यांची रावेर तालुका सरचिटणीसपदी निवड झाली. त्यांचा नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला अनिल आसेकर, शे. मुनाफ, विनायक जहुरे, चंद्रकांत वैदकर, कांतीलाल गाढे, सादिक पिंजारी, दिनेश सैमिरे, प्रशांत गाढे, उमेश तायडे, सुनील महाजन, शेख हमीद, ईश्वर महाजन, राहत खाटीक, विजय के. अवसरमल, जितू इंगळे आदी पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक जहुरे यांनी केले तर आभार कांतीलाल गाढे यांनी मानले.