मा. मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांना ‘सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक’ पुरस्कार प्रदान..

आबिद शेख/अमळनेर
पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूलचे मा. मुख्याध्यापक श्री. जे. एस. देवरे यांना इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड संस्थेच्या वतीने ‘सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला.
मुंबईतील हिरानंदानी गार्डन, पवई येथे रंगारंग समारंभात हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना सुपूर्द करण्यात आला. भारतातील नामांकित शाळांमधील शेकडो मुख्याध्यापकांच्या नामांकनातून श्री. देवरे यांची निवड करण्यात आली. त्यांचे 28 वर्षांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रख्यात आय.पी.एस अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. किरण बेदी आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या हस्ते श्री. देवरे यांना गौरविण्यात आले. सोबतच, त्यांना ₹3,000/- ची रोख रक्कम देखील प्रदान करण्यात आली.
या विशेष सन्मानाबद्दल खा. शि. मंडळाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष, पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन श्री. प्रदीपजी के. अग्रवाल, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, तसेच शाळेतील समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.
हा पुरस्कार केवळ श्री. देवरे यांचा नाही, तर जळगाव जिल्हा आणि अंमळनेर नगरीसाठी अभिमानाची बाब असून, भविष्यातील मुख्याध्यापकांसाठी तो प्रेरणादायी ठरणार आहे.