अमळनेरच्या स्वप्ना पाटील यांना वूमेन अॅचिव्हर्स अवॉर्डने सन्मान..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : सामाजिक कार्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या स्वप्ना विक्रांत पाटील यांना यंदाचा वूमेन अॅचिव्हर्स अवॉर्ड २०२५ दै. लोकमततर्फे प्रदान करण्यात आला.
उत्तर महाराष्ट्रातील (जळगाव, धुळे, नंदुरबार) सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य व राजकीय कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना हा सन्मान दिला जातो. अमळनेरच्या वडचौक येथील सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना पाटील यांना हा पुरस्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यात आमदार राजूमामा भोळे, अभिनेत्री मीरा जगन्नाथ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, डॉ. केतकी पाटील, किरण बच्छाव व लोकमतचे मुख्य संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते.
स्वप्ना पाटील यांच्या या गौरवामुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.