नंदुरबारमध्ये ईद-उल-फित्रचा उत्साह: भाईचारा आणि सद्भावनेचा संदेश..

24 प्राईम न्यूज 1 Apri 2025
नंदुरबार येथे इस्लाम धर्माचा सर्वात मोठा सण, ईद-उल-फित्र (रमजान ईद) उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक 31 मार्च 2025 रोजी, सोमवार सकाळी 9 वाजता ईदगाह मैदानावर हाजी हाफिज अब्दुल्ला साहेबांनी नमाज पठण केले. नमाज पठणानंतर अक्कलकुवा येथील हजरत मौलाना उजेफा साहेबांनी परमेश्वराची दुवा पठण केली.
या पवित्र सोहळ्याला राजकीय, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. ईद निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देऊन आलिंगन करत भाईचार्याचा संदेश दिला. या उत्सवाने समाजात बंधुभाव आणि एकात्मतेचा महत्त्वाचा संदेश दिला. आमदार चंद्रकांत रघुवंशी खासदार एडवोकेट गोवाल पाडवी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम पोलीस अधीक्षक श्रावण दत्त साहेब एजाज बागवान (राज्य महासचिव, ऑल इंडिया मुस्लिम त्योहार कमिटी, नई दिल्ली) माजी नगरसेवक विलास रघुवंशी, मोहन भाऊ माळी, कैलास पाटील, रियाज कुरेशी सामाजिक कार्यकर्ते मोहन शराफ, रऊफ शहा, अल्ताफ मेमन, लियाकत बागवान, फारूक मेमन माजी पोलीस उपनिरीक्षक सय्यद मकसूद, शरीफ खाटीक सदा जनसेवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष सय्यद मकसूद रोटरी क्लब अध्यक्ष नंदुरबार सय्यद इसरार हा सोहळा शांततेत पार पडला आणि संपूर्ण नंदुरबारमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. ईदच्या निमित्ताने समाजातील सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन बंधुभावाचे दर्शन घडवले.