मारवड शाखेशी सलग्न अंतुर्ली-रजांणे सोसायटीची बँक कर्जाची १००% परतफेड..

आबिद शेख/अमळनेर
मारवड शाखेशी संलग्न अंतुर्ली-रजांणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी बँक कर्जाची १००% परतफेड केली आहे.
या ऐतिहासिक परतफेडीचे श्रेय बँकेचे संचालक मा. आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाला जाते. संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजीराव आनंदराव पाटील, व्हा. चेअरमन सौ. विमलबाई रामदास पाटील, तसेच सर्व संचालक मंडळ, विभागीय उपव्यवस्थापक श्री. अनिल अहिरराव, क्षेत्रीय अधिकारी श्री. व्ही. बी. सोनवणे, शाखा व्यवस्थापक श्री. राकेश पाटील, संपूर्ण कर्मचारी वर्ग आणि संस्थेचे सचिव श्री. कृष्णंकांत भावसार यांनी विशेष परिश्रम घेतले.
जिल्हा बँकेच्या वतीने बँकेचे कार्यकारी संचालक श्री. जितेंद्रजी देशमुख आणि कर्ज वसुली व्यवस्थापक श्री. मंगल दादासाहेब सोनवणे यांनी संस्थेच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.