ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा जवळीक? राज ठाकरे यांच्या वक्तव्यानं रंगले राजकीय चर्चेला नवे वळण..

24 प्राईम न्यूज 20 April 2028
मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर नेहमीच एकमत असलेले पण राजकारणात वेगवेगळ्या वाटा निवडलेले ठाकरे बंधू — उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे — आता पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेने चर्चेत आले आहेत. गेल्या काही वर्षांत दोघांनी अनेकदा एकमेकांपासून अंतर ठेवले, टाळी देण्याचे प्रयत्न फसले, पण सध्या दोघेही आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत.
याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची तयारी दाखवली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, याकडे संपूर्ण राज्याचे आणि शिव-मनसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
राजकारणात कधी काय घडेल याचा अंदाज बांधता येत नाही, पण राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर भविष्यात ठाकरे बंधूंची नवी राजकीय मैफल पाहायला मिळणार का, याची उत्सुकता सर्वत्र आहे.