तळवाडेतील शेतकऱ्याच्या मक्का पिकाचे शॉर्टसर्किटमुळे नुकसान; -वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान
तळवाडे (ता. अमळनेर) येथील शेतकरी महेंद्र शिवराम पाटील यांच्या शेतातील मक्का पिकाचे शॉर्टसर्किटमुळे मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतात वीजेचे अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे या तारांमध्ये स्पार्क निर्माण झाला आणि त्यामुळे शेतात लागवड केलेल्या मका पिकाने पेट घेतला.
या आगीत मका पिकाचे प्रमाणात नुकसान झाले असून हजारो रुपयांचे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागले आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीही वीज वितरण कार्यालयात तक्रार करून झुकलेल्या खांबांबाबत माहिती दिली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकारामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांना वेळीच नुकसानभरपाई मिळावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.