स्पा सेंटरच्या आड देहविक्रीचा धंदा उघड – पोलिसांची कारवाई, चार महिलांची सुटका

24 प्राईम न्यूज 20 April 2025
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड (स्थानीक गुन्हे शाखा, जळगाव) यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, जळगाव शहरातील गोविदा रिक्षा स्टॉप जवळील नयनतारा आर्केड मॉलमधील शॉप नं. ४०८ येथील “03 Day Spa” या स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय केला जात आहे.
सदर स्पा सेंटर जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने ही माहिती पोलीस निरीक्षक श्री. अनिल भवारी यांना देण्यात आली. त्यानुसार स्पा सेंटरवर बनावट ग्राहक पाठविण्यात आले. या ग्राहकास स्पा मसाज व्यतिरिक्त इतर सेवांचे आमिष देण्यात आले. त्यामुळे स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान स्पा सेंटरचा मॅनेजर राजु माधुजी जाट (रा. कलोधिया, तह. पिंपरी, जि. भिलवाडा, राजस्थान) यास अटक करण्यात आली असून, त्याच्या देखरेखीखाली चार महिलांकरवी स्पा सेंटरच्या आड देहविक्री सुरू होती. या महिलांना स्पा सेंटरचा मालक विक्रम राजपाल चंदमारी ढानी (वय २०, रा. चत्तरगढ पत्ती, जि. सिरसा, हरियाणा) प्रोत्साहन देत होता. दोघांविरुद्ध PITA Act अंतर्गत जळगाव शहर पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान चार पिडीत महिलांची सुटका करून त्यांना आशादिप निराधार महिला वसतीगृह, जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर कारवाईमध्ये मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक श्री. अनिल भवारी, सहा. पो.नि. शितलकुमार नाईक, पो.उप.नि. शरद बागल, पो.उप.नि. महेश घायतड, सहा. फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, सुनील पाटील, पो.ह.वा. अक्रम शेख, विजय पाटील, योगेश पाटील, महिला श्रे. पो.उ.नि. वैशाली महाजन, म.पो.ह.वा. प्रियंका कोळी, मंगला तायडे व चालक दीपक चौधरी यांनी सहभाग घेतला.
जळगाव शहरात स्पा सेंटरच्या आड चालणाऱ्या देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांची ही मोठी कारवाई असून, यापुढे अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.