बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. – आमदार अनिलदादा पाटील यांचे आवाहनअक्षय तृतीया निमित्त बालविवाह मुक्त भारत अभियानात अमळनेरकरांचा सहभाग..

आबिद शेख/अमळनेर
अक्षय तृतीया आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘बालविवाह मुक्त भारत’ या देशव्यापी मोहिमेस अमळनेरमध्ये मोठा पाठिंबा मिळत आहे. आमदार अनिल भाईदास (दादा) पाटील यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवत अमळनेर तालुक्यातील नागरिक, पालक, समाजप्रेमी, धर्मगुरू आणि स्थानिक समित्यांना बालविवाह रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
‘जस्ट राईट फॉर चिल्ड्रन’ या आधार बहुउद्देशीय संस्थेच्या उपक्रमांतर्गत या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार पाटील यांनी बालविवाह ही सामाजिक कुप्रथा आहे, ती संपवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर, गटविकास अधिकारी एन.आर. पाटील, साहित्यिक कृष्णा पाटील, शहर तलाठी आबा सोनवणे, ऍड. तिलोत्तमा पाटील, माजी नगरसेवक मनोज पाटील, दीपक पाटील, नरेंद्र संदानशिव, प्रताप शिंपी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्तार खाटीक, इम्रान खाटीक, बाळू पाटील, अनिल शिसोदे, तसेच नगावचे माजी सरपंच महेश पाटील उपस्थित होते.
आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद, प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या अभियानासाठी मेहनत घेतली.