हम वक्फ बचाने निकले है.. आओ हमारे साथ चलो.. -या घोषणेसह कासोदा येथे वक्फ बचाव समितीचा जनजागृती दौरा..

24 प्राईम न्यूज 2 May 2025
वक्फ बचाव समिती जळगाव तर्फे १ मे महाराष्ट्र दिनी कासोदा येथे मदिना मस्जिद व ऐ टी टी हायस्कूल च्या मैदानावर नवीन वक्फ कायदा कसा हानिकारक आहे व तो रद्द करण्यासाठी न्यायालयात व घटनेने दिलेल्या अधिकारानुसार जनमानसात त्याचा विरोध सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून कासोदा येथे मदिना मस्जिद मध्ये संध्याकाळी व एटीटी शाळेच्या मैदानावर रात्री या कायद्याविषयी वक्फ बचाव समितीचे समन्वयक फारुक शेख, मौलाना उमर नदवी, अनिस शहा, अनवर शिकलगर, कासिम उमर, आदींनी जनजागृती केली. तर या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जळगाव चे राष्ट्रीय कवी (शायर) साबीर मुस्तफाबादी यांनी केले.
हम वक्फ बचाने निकले है…..
ए टी टी हायस्कूलच्या मैदानावर हजारोच्या संख्येने उपस्थित जनसमुदायासमोर फारुक शेख यांनी हम वक्फ बचाने निकले है, आओ हमारे साथ चले ही घोषणा करताच त्याला उपस्थिता कडून प्रतिसाद देण्यात आले असता पूर्ण गीत सादर केले असता समोरून प्रतिसाद स्वरूपात आओ हमारे साथ चलो असे प्रति उत्तर मिळाल्यावर संपूर्ण मैदानावर नवीन वक्फ कायदा विरुद्ध तिरस्कार निर्माण झाला.
हम वक्फ बचाने निकले है
आओ हमारे साथ चलो
दस्तूर बचाने निकले है
आओ हमारे साथ चलो
हम मुल्क बचाने निकले हैं
आओ हमारे साथचलो
मस्जिदे बचाने निकले हैं
आओ हमारे साथ चलो
मदरसे से बचाने निकले हैं
आओ हमारे साथ चलो
आसार बचाने निकले हैं
आओ हमारे साथ चलो
मिरास बचाने निकले हैं
आओ हमारे साथ चलो
पहचान बचाने निकले है
आओ हमारे साथ चलो
हम तंग है चिरा दस्ती से
आओ हमारे साथ चलो
सरकार की गुंडागर्दी से
आओ हमारे साथ चलो
क्यों दूर खड़े हो पास चलो
आओ हमारे साथ चलो
हाथों में लेकर हाथ चलो
आओ हमारे साथ चलो…