वेदश्रीला वाचवा: अमळनेरची चिमुरडी मृत्यूशी झुंजतेय – तुमचं प्रेम, तुमची मदत तिचं आयुष्य वाचवू शकते..

0


आबिद शेख/अमळनेर

योजना कालावधी : दिनांक 6 जुन 2025 पर्यंत, आजच या दोन्ही ऑफरचा लाभ घ्या .. !

अवघ्या १६ महिन्यांची निष्पाप चिमुरडी – वेदश्री लक्ष्मीकांत सोनार, एका अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक आजाराशी झुंजतेय. नुकतीच चालायला शिकलेली ही चिमुकली अजून “आई” म्हणायचंही शिकलेली नाही, पण तिचं बालपण नियतीने एका कठीण वळणावर आणून ठेवलं आहे.

वेदश्रीला “Bilateral Acoustic Neuroma / Vestibular Schwannoma” हा अत्यंत दुर्मिळ आणि त्रासदायक आजार झालाय. तिच्या दोन्ही कानांमधील नसांवर विपरीत परिणाम झाल्याने तिचं ऐकणं, आणि त्यासोबतच बोलणंही थांबण्याच्या टोकावर आलं आहे. मुंबई व नाशिकमधील डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे – अन्यथा वेळ हातातून निसटेल.

एक सामान्य बाप, एक असामान्य संकट

लक्ष्मीकांत सोनार – एक सर्वसामान्य कामगार बाप, आपल्या लेकीचं हसू परत मिळवण्यासाठी धडपडतोय. नातेवाईक, मित्र, गावकरी – सगळ्यांनी शक्य तेवढं दिलंय. पण अजूनही सुमारे ३० लाख रुपयांची कमतरता आहे. ही रक्कम त्यांच्या स्वप्नातही मावणारी नाही.

मदतीचा एक हात, जीवनाचं संजीवनी

वेदश्रीसाठी https://www.ketto.org/fundraiser/help-this-baby-get-a-second-chance-at-life-this-baby-is-battling-between-life-and-death-please-support-1002484 या लिंकवरून फंडरेझिंग सुरू करण्यात आलं आहे.
PhonePe डोनेशन लिंक: https://fundraiser-request-to-help-this-baby.amalner360.com/
QR कोड स्कॅन करूनही देणगी देता येते.
१२A व ८०G अंतर्गत आयकर सवलत उपलब्ध आहे.

अमळनेरकरांनो, आता तुमचं पाऊल पुढे टाका

जर ३०,००० लोकांनी फक्त १०० रुपये दिले, तरीही वेदश्रीचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. शाळा, महाविद्यालयं, व्यापारी, डॉक्टर्स, सामाजिक संस्था, राजकीय मंडळं – प्रत्येकाने या बाळासाठी एक पाऊल पुढे टाकणं आवश्यक आहे.

ही फक्त मदत नाही – ही माणुसकीची परीक्षा आहे.

वेदश्री अजून “आई” म्हणू शकलेली नाही. पण तुमच्या मदतीने ती बोलायला शिकू शकते, हसू शकते – आणि जगू शकते. आज तुम्ही दिलेली मदत उद्याचं एक आयुष्य वाचवू शकते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!