“ऑपरेशन सिन्दूर” अंतर्गत भारताची पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक – देशभरातून सरकारला पाठिंबा

24 प्राईम न्यूज 7 May 2025

भारताने “ऑपरेशन सिन्दूर” अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ वेगवेगळ्या ठिकाणांवरील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून त्यांना नष्ट केले आहे. हा कठोर निर्णय जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडवण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घेण्यात आला, ज्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता.
या कारवाईनंतर भारतभरातून केंद्र सरकारच्या निर्णयाला मोठा पाठिंबा मिळत आहे. विशेष म्हणजे, यावेळी विरोधकही सरकारसोबत उभे राहिले असून देशाच्या सुरक्षेसंदर्भात एकजुटीचा संदेश दिला आहे. देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी घेतलेल्या या निर्णायक पावलाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.