ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर ABVP अमळनेरचा जल्लोष; पाकचा पुतळा जाळून साजरा केला आनंदोत्सव..

आबिद शेख/अमळनेर

विशेष ऑफर
अमळनेर : भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या यशस्वी कारवाईनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) अमळनेर शाखेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. पाकिस्तानचा पुतळा जाळून, घोषणा देत आणि फटाके फोडून कार्यकर्त्यांनी देशभक्तीचा उत्साह व्यक्त केला.

या वेळी शहर मंत्री धीरज माळी, शहर सहमंत्री आदित्य चौधरी, हिमांशु पाटील, अभिषेक भावसार, विद्यार्थी कार्यकर्ते तसेच प्रा. देवेंद्र तायडे, प्रा. बापू संदनाशिव, अभिषेक पाटील, कल्पेश पाटील, विजय पाटील, हेमंत सैंदाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी “भारतीय सेना झिंदाबाद”, “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा घोषणा देत देशविरोधी कारवायांवर कठोर प्रत्युत्तर दिल्याबद्दल भारतीय लष्कराचे अभिनंदन केले. या उपक्रमामुळे युवकांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक बळकट झाल्याचे दिसून आले.