राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ निवड चाचणी सुरू.

24 प्राईम न्यूज 8 May 2025

१५ वर्षाखालील मुलं-मुलींसाठी स्पर्धा; १० मेपर्यंत संधी
शिरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आंतर जिल्हा १५ वर्षाखालील मुलं आणि मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ निवड चाचणीस सुरुवात झाली आहे. ही निवड प्रक्रिया श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत पार पडत आहे आणि ती १० मे २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.

या स्पर्धेत सहभाग घेण्याची पात्रता फक्त त्याच खेळाडूंना आहे, ज्यांचा जन्म १ जानेवारी २०१२ नंतर आणि ३१ डिसेंबर २०१३ आधी झालेला आहे. पात्र खेळाडूंनी आपले जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्ड सोबत घेऊन निवड चाचणीस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
चाचणीसाठी उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंनी हिमाली बोरोले, गुंजा श्रीवास्तव, छाया पाटील, राहील शेख व वसीम शेख यांच्याशी संपर्क साधावा आणि आपली नावे सीएसआर मध्ये नोंदवावी, असे आवाहन जिल्हा फुटबॉल संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे व सचिव फारूक शेख यांनी एका अधिकृत पत्रकाद्वारे केले आहे.