लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी देशसेवेसाठी रवाना!”माझ्या कुंकवाला देशासाठी पाठवत आहे” – नववधूचा अभिमान.

24 प्राईम न्यूज 10 May 2025

वैयक्तिक आयुष्यापेक्षा देशसेवा मोठी — याचा वास्तव अनुभव पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथील लष्करी जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील याच्या आयुष्यात आला. सोमवारी त्याचे विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. पण मंगलाष्टक संपले आणि अवघ्या 48 तासांत, मंगळवारीच त्याला युद्धजन्य परिस्थितीत मुख्यालयात हजर होण्याचे तातडीचे आदेश प्राप्त झाले.

जसे आदेश मिळाले, तसे मनोजने गुरुवारी देशसेवेसाठी कूच केले. पाचोरा रेल्वे स्थानकावर त्याला निरोप देण्यासाठी त्याची नवविवाहीत पत्नी यामिनी पाटील व गावकरी उपस्थित होते. अश्रूंना बांध घालत यामिनी म्हणाली, “माझ्या कुंकवाला मी देशाच्या रक्षणासाठी पाठवत आहे, याचा मला अभिमान आहे.”
मनोज ज्ञानेश्वर पाटील हा भारतीय लष्करात सेवा बजावत असून त्याची ही देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा पाचोरा तालुक्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.