शिर्डीत साई संस्थान ‘अलर्ट मोड’ वर – सुरक्षा व्यवस्था कडक..

24 प्राईम न्यूज 10 May 2025
भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. शिर्डीचे साईबाबा देवस्थानही आता ‘अलर्ट मोड’ वर गेले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी एक महत्त्वाची बैठक घेऊन सुरक्षेची सविस्तर समीक्षा केली.

अक्षय तृतीया निमित्त ऑफर
या बैठकीत, मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांची तपासणी करूनच प्रवेश देण्यात यावा, तसेच पूजा व पूजासामग्रीची काटेकोर तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने शिर्डीत भाविकांची गर्दी अधिक होण्याची शक्यता लक्षात घेता अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

प्रत्येक भाविकास मंदिरात प्रवेश देताना फुलं, हार आणि अन्य पूजासामग्रीचे स्कॅनिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. देशातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले आहे.