तांबेपुरातून अल्पवयीन मुलीचे कारमधून अपहरण – आरोपीविरोधात गुन्हा दाखल.

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – तांबेपुरा परिसरात रेल्वे पुलाजवळ ६ मे रोजी दुपारी १२:४५ वाजता एका अल्पवयीन मुलीचे कारमधून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तांबेपुरा न्यू प्लॉटमधील १७ वर्षे ७ महिने वयाची मुलगी आपल्या बहिणीसोबत महादेव मंदिराजवळ लग्नसमारंभात जेवणासाठी गेली होती. त्याच दरम्यान शुभम किशोर पारधी (रा. धरणगाव) हा लाल रंगाच्या कारमधून आला आणि जबरदस्तीने मुलीला गाडीत बसवून घेऊन गेला.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये शुभम पारधीविरोधात भारतीय दंड संहिता कलम १३७(२) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करत आहेत.