मदरसा अनवारूल उलूम च्या प्राचार्य पदी कारी मुश्ताक इशाती. – एकता,वक्फ बचाव व हुफ्फाज तरफे गौरव..

24 प्राईम न्यूज 10 May 2025

जळगाव जिल्ह्यातील मेहरून येथे ५३ वर्षापासून सुरू असलेल्या मदरसा अनवारूल उलूम,मेहरून ,जळगावच्या ५ व्या प्राचार्य पदी कारी मुश्ताक खलील शेख इशाती यांची १ मे २५ पासून नियुक्ती झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव जिल्हा एकता संघटना, हुफ्फाज फाउंडेशन व वक्फ बचाव समितीच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कारी मुस्ताक इशाती यांचा परिचय
मदरसा अनवरूल उलूम मध्ये १९९४ पासून सेवेला सुरुवात केली असून आज वयाच्या ६० व्या वर्षी त्यांना ५ वे प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मूळचे अमरावतीचे १९९४ साली मदरसा मध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती. मदरसा ची सेवा करीत असतानाच त्यांनी अक्सा मस्जिद मेहरून येथे ४ वर्ष इमाम व जामा मस्जिद मरकज येथे १४ वर्ष नायब इमाम म्हणून कार्य केलेले आहे.
कारी मुश्ताक यांचे सत्काराला उत्तर
मदरसा मध्ये धार्मिक शिक्षणा सोबत आधुनिक शिक्षण कार्य जोमाने सुरू करू तसेच बांधकाम क्षेत्रातील अपूर्ण कामे त्वरीत करण्याचे आवाहन त्यांनी स्वीकारले असून चांगले शिक्षण देण्याचा ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना नमूद केले.
एकता संघटन, हुफ्फाझ फाउंडेशन व वक्फ बचाव समितीतर्फे यांनी केले स्वागत
वक्फ बचाव चे मुफ्ती खालिद, मुफ्ती रमीज, एकता संघटनेचे फारुक शेख, हुफ्फाझ फाउंडेशनचे हाफिज रहीम पटेल यांनी शॉल देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळेस हाफिज इम्रान काकर, हाफिज मुख्तार, हाफिज वसीम पटेल, मौलाना गुफराना, हाफिज शफीक रहेमानी, अब्दुल रज्जाक पटेल, हाफिज अब्दुल मतीन यांची विशेष उपस्थिती होती.