संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाऊंडेशन तर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन…

अमळनेर(प्रतिनिधी)
शिवजन्मोत्सव २०२३ निमित्ताने अमळनेर येथील संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे…! येथील राजमुद्रा फाऊंडेशन तर्फे शिवजयंती निमित्ताने प्रत्येक वर्षी विविध स्पर्धा तसेच उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. शिवजन्मोत्सव २०२३ निमिताने संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ फेब्रुवारी , शुक्रवार


रोजी सकाळी ९ : ०० वाजता ढेकू रोडवरील फोर्ट्स कार्यालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका तसेच शहरातील महाविद्यालयीन , दहावी - बारावी पास नापास विद्यार्थी , आय.टी.आय. तसेच पदवीधर तरुण तरुणींसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात नाशिक येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी ९०९०२०३३९९ या क्रमांकावर संपर्क करावा तसेच या रोजगार मेळाव्यासाठी अधिकाअधिक गरजू सुशिक्षित तरुणांनानी उपस्थिती द्यावी असे आवाहन राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष शाम पाटील यांनी केले आहे...!