जी.एस. हायस्कूलचा ९५.९७% निकाल; लोकेश वाल्हे व तन्मय चौधरी प्रथम..


अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 990/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
दहावीचा परीक्षेत लोकेश सुरेश वाल्हे व तन्मय विश्वनाथ चौधरी यांनी ९१% गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक हिमांशू विलास पाटील (८९.००%) याने मिळवला असून तृतीय क्रमांक गौरव नितीन पाटील व केदार उमेश सूर्यवंशी (८८.८०%) यांनी मिळवला आहे.

एकूण ३४८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी, खानदेश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व्ही.एम. पाटील, माजी मुख्याध्यापक बी.एस. पाटील, उपमुख्याध्यापक ए.डी. भदाणे, पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे, सी.एस. सोनजे, शिक्षक प्रतिनिधी आर.जे. पाटील, मुख्य लिपिक शाम पवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.