धाडसी भाग्यश्रीचा अपघाती मृत्यू; अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुर्दैवी घटना..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 990/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
अमळनेर तालुक्यातील जानवे येथील भाग्यश्री दीपक पाटील या तरुणीचा अज्ञात वाहनाने कट मारल्याने झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १२ मे रोजी रात्री साडेआठ वाजता अमळनेर-धुळे रस्त्यावरील लोंढवे फाट्याजवळ घडली.

भाग्यश्री ही तिच्या वडिलांच्या दुग्ध व्यवसायात सक्रिय सहभागी होती. दुधाचे कॅन मोटरसायकलला बांधून ती एकटीच कधी अमळनेर, तर कधी धुळे शहरात जात असे. धाडसी स्वभावाच्या भाग्यश्रीमुळे दीपक पाटील यांच्या व्यवसायात चांगलीच वाढ झाली होती. दीड महिन्यापूर्वी वडिलांचा अपघात झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मोटरसायकल चालवण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे भाग्यश्रीनेच सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती.
१२ मेच्या रात्रीही ती नेहमीप्रमाणे दूध घेऊन अमळनेरला येत होती. मात्र लोंढवे शिवारात अज्ञात वाहनाने अचानक कट मारल्याने तिची मोटरसायकल रस्त्यावर पडलेल्या झाडावर आदळली. यात ती खाली पडली आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला.
जानवेतील भूषण पाटील यांनी तातडीने गावात माहिती कळवताच ग्रामस्थांनी तिला दवाखान्यात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.