राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत प्रवीण महाजन प्रथम..

एरंडोल ( प्रतिनिधी) पिंपळनेर जिल्हा धुळे येथे महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या मुक्ताई यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त योजीलेल्या राज्यस्तरीय आई काव्यलेखन स्पर्धेत येथील कवी, सामाजिक कार्यकर्ते तथा औदंबर साहित्य रसिक मंचचे कार्याध्यक्ष प्रवीण आधार महाजन यांच्या माय या कवितेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकच्या ज्येष्ठ कवयित्री शालिनीताई भालेराव तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचेज्येष्ठ साहित्यिक साहेबराव नंदन ,कवी संजय आहेर,कवी तानाजी खोडे,संस्थेचे अध्यक्ष संभाजीराव पगारे, प्रा.पुष्पलता पगारे, प्रा.विजयराव सोनावणे,प्रा. सविता पगारे,कवी ललित साळवे,संचालक स्वप्नील पगारे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत महाराष्टातील अनेक कवींनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संभाजीराव पगारे यांच्या हस्ते कवी महाजन सन्मानचिन्ह ,मानपत्र व रोख १००० रुपये देऊन गौरव केला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. गोपाळ देशमुख, डॉ. प्रतिभा चौरे, प्रा. प्रशांत कोतकर यांनी जबाबदारी सांभाळली. श्री. महाजन यांच्या या निवडीबद्दल औदांबर साहित्य रसिक मंचचे अध्यक्ष ऍड. मोहन शुक्ला,प्रा. वा. ना. आंधळे,कवी विलास मोरे, ज्येष्ठ कवयित्री मंगला रोकडे, निवृत्त डि वाय एस पी राजेंद्र रयसिंगे,कवी निंबा बद्गुजार,निवृत्त तहसीलदार अरुण माळी, ज्येष्ठ कवयित्री शकुंतला पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.