मोतीनाला रुंदीकरण कामाचा आ.फारुख शाह यांचे हस्ते शुभारंभ..!

धुळे(
अनिस अहेमद) धुळे शहर मतदार संघात आ.फारुख शाह यांनी आपल्या कार्य शैलीद्वारे वेगळा ठसा उमटविलेला आहे. निव्वळ विकासाचा ध्यास हाच आमुचा मूलमंत्र या उक्तीप्रमाणे आ.शाह यांनी विकास कामांचा धडका लावलेला आहे.
शहर वासीयांच्या नेमक्या समस्या आणि गरजा ओळखून काम करण्याची पद्धत प्रशंसनिय आहे. धुळे शहरातील शहर व साक्रीरोडला जोडणाऱ्या

मोतीनाल्यावरील अरुंद पुलामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागेत ही गरज ओळखून आ.फारुख शाह यांनी मोतीनाला पुल रुंदीकरणासाठी ४ कोटी रुपये निधी मंजुर करून आणला.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या पुलाच्या रुंदीकरणाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी सार्वजनिक. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील,कनिष्ठ अभियंता लोकरे, मनपा.कनिष्ठ अभियंता हेमंत पावटे.सलीम शाह नगरसेवक नासिर पठाण, मूक्तार अन्सारी ,नगरसेवक गनी डॉलर,नगरसेवक सईद बेग,माजी नगरसेवक अनिल दामोदर,मौलवी शकील,इकबाल शाह,आमिर पठाण ,साजिद साई,राजु शेख,साबीर सैय्यद,निजाम सय्यद,कैसर अहमद,आबिद शाह,आसिफ शाह,सलीम शाह ,मोईनोड्डीन शाह,जावेद शाह, छोटू मच्छी वाले, माजीद पठाण,,मुस्ताक पहिलवान,जोगेंद्र जाधव , साकिव शाह आदी उपस्थित होते. मा. संपादक सो.