मोकाठ कुत्र्यांचा उपद्रव वाढला: भिलाली येथे लग्नाला आलेल्या मुलावर हल्ला, धुळे सिव्हिलमध्ये उपचार सुरू.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
बेटावद, भिलाली, पढावद परिसरात पांझरा नदीच्या काठावर मोकाठ व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे लहान बालक, वृद्ध अशा निष्पाप नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

आज भिलाली येथे लग्नासाठी आलेल्या शिरपूर तालुक्यातील चांदपुरी गावातील एका मुलावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याआधी बेटावद ग्रामपंचायतीतर्फे महापालिका आयुक्त तसेच शिंदखेडा पशुसंवर्धन विभागाला निवेदन देण्यात आले होते. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व नागरिकांनी एकत्र येत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
सध्या ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी या मोकाठ कुत्र्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.