अमळनेरमध्ये गांजाप्रिय तरुणांवर पोलिसांचा धडाका!इदगाह मैदानाशेजारी गांजा सेवन करणारे चार जण अटकेत..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर: शहरात पुन्हा एकदा गांजासेवन करणाऱ्या तरुणांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. गांजाच्या विळख्यात अडकलेल्या चार तरुणांना अटक करून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, डीबी पथकाच्या अधिकाऱ्यांनी गांधलीपुरा येथील इदगाह मैदानाजवळील रेल्वे ट्रॅकजवळ छापा टाकला. यावेळी जमील उर्फ अय्युब रऊफ पिंजारी (वय २३), अनिस शेख अजीम (वय २९), आवेश शरीफ खाटीक (वय २३) आणि शाहरुख खान सलीम खान या तरुणांना गांजा सेवन करताना रंगेहाथ पकडले.
या सर्वांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ च्या कलम ८(क) आणि २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विनोद सोनवणे आणि चंद्रकांत पाटील करत आहेत.
यापूर्वीही अशाच प्रकारच्या कारवाया झाल्या असून, पोलिसांच्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे गांजाच्या आहारी गेलेल्या तरुणांवर आळा बसण्यास मदत होत आहे. नागरिकांतून या कारवाईचे कौतुक केले जात आहे.