राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धाजळगावची रत्नागिरीवर ६.० ने विजयी सलामी..


24 प्राईम न्यूज 26 May 2025
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई व धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरजिल्हा १४ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा शिरपूर येथील मिलिटरी हायस्कूल येथे सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्याचा पहिला सामना रत्नागिरी जिल्ह्या सोबत झाला असता त्यात जळगाव संघाने एकतर्फी ६ गोल मारून विजय नोंदविला.
२६ मे रोजी जळगाव चा सामना रायगड जिल्ह्याशी होणार आहे.

रत्नागिरी विरुद्ध गोल करणारे जळगाव चे खेळाडू
बिलाल शेख यांनी २ तर,रशीद शेख,पार्थ पाटील, अंश आव्हाड व अर्णव पाटील यांनी प्रत्येकी एक गोल करून जळगाव संघास विजयी केले.
संघासोबत प्रशिक्षक म्हणून असलेले सेंट्रल रेल्वे भुसावळचे सीटीई नितीन डेव्हिड व व्यवस्थापक वसीम रियाज यांचे खेळाडूंना मार्गदर्शन मिळत आहे.
विजय संघाचे सचिव फारुक शेख, कार्याध्यक्ष डॉ. अनिता कोल्हे, वरिष्ठ उपाध्यक्ष जफर शेख व इम्तियाज शेख आदींनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले आहे.