अमळनेरात चारचाकी व दुचाकी चोरीच्या घटना; पोलीस तपास सुरु.

0

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील ओम साई श्रद्धा नगर येथून एक चारचाकी गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २४ मे रोजी रात्री घडली. प्रवीण हरिश्चंद्र ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे मेव्हणे मनीष राजाराम पवार यांची अंदाजे दीड लाख रुपये किमतीची चारचाकी (क्रमांक MH18 AJ 3110) त्यांनी त्यांच्या कुटुंबासह अमळनेर येथे आणली होती.

मनीष पवार दिल्लीला गेले असल्याने ही चारचाकी प्रवीण ठाकूर यांच्या घरासमोर उभी करण्यात आली होती. मात्र पहाटे पाच वाजता ठाकूर लघुशंकेसाठी उठल्यावर गाडी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी तत्काळ अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.

या प्रकरणात पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशीव, उज्वल म्हस्के, प्रशांत पाटील, जितेंद्र निकुंभे, निलेश मोरे, रवी पाटील, अमोल पाटील तसेच एलसीबी पथकातील प्रवीण मांडोळे, संदीप पाटील, राहुल कोळी यांच्या पथकांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी मोहिम राबवली आहे.

दरम्यान, टाकरखेडा येथून देखील मनोहर विश्वास पाटील यांची MH19 EQ 8746 ही अंदाजे ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीस गेली. त्यांनी ती दुचाकी घराबाहेर लावली होती. पहाटे ३ वाजता लघुशंकेसाठी जाग आल्यावर दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

गावात सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून गुन्हेगारांचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!