पाकिस्तानला आणखी कडक उत्तर मिळेल – असदुद्दीन ओवैसी यांचा इशारा.

24 प्राईम न्यूज 26 May 2025

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बेहरीन दौऱ्यावर गेले असताना, तिथे झालेल्या कार्यक्रमात एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला ठाम इशारा दिला आहे.

ओवैसी म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून भारत दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जात आहे. या घटनांमध्ये आपण अनेक निष्पाप नागरिक गमावले आहेत. यामागे पाकिस्तानकडून दहशतवादी गटांना मिळणारा आधार कारणीभूत आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणे आणि मदत करणे थांबवत नाही, तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “पुढच्या वेळेस जर पाकिस्तानने असे कृत्य करण्याचे धाडस केले, तर भारताकडून मिळणारे उत्तर त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक कडक असेल.”