मंगरूळमध्ये १९ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; जुन्या आठवणींना दिला उजाळा.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

अमळनेर– मंगरूळ येथील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयातील सन २००५-०६ मध्ये दहावीमध्ये शिकलेले माजी विद्यार्थी तब्बल एकोणावीस वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या शाळेत एकत्र आले. रविवारी (दि.२५) आयोजित स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह शाळेच्या आठवणींना उजाळा देत, स्नेह आणि सौहार्दाचे सुंदर दर्शन घडवले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय देताना शालेय जीवनातील आठवणी शेअर केल्या. कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून संस्था चालक श्रीकांत अनिल पाटील, तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश पाटील उपस्थित होते. यावेळी शिक्षक संजय पाटील, प्रभुदास पाटील, अशोक सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शितल पाटील, सीमा मोरे, पी.आर. पाटील, मनोज पाटील, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे माजी विद्यार्थ्यांनी ऋण मानले. सूत्रसंचालन जागृती पाटील यांनी तर माजी विद्यार्थीनी कवयित्री कल्पना देवरे यांनी चारोळ्या व कविता सादर करून सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईश्वर भदाणे, रावसाहेब पाटील, प्रदीप पाटील, गुलाब भदाणे, कुंदन वाघ, शरद पाटील, नगराज पाटील, योगेश पाटील, सचिन भदाणे, नरेंद्र बागुल, बापू धनगर, गणेश पाटील, निंबा पाटील, जितेंद्र पाटील, सतीश बागुल, नारायण पाटील यांच्यासह इतर माजी विद्यार्थी आणि शाळेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.